उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच इतर कलांची आरधना करावी शिक्षण घेऊन जर नोकरी नाही मिळाली तर व्यावसायाभिमुक होण्याच्या दृष्टीने आतापासूनच संवेदनशील   मनाने कविता लिहायला लागा आणि जेंव्हा लिहिताना मनात ताल,लय सापडला आहे असे वाटल्यावर गाण्याची निर्मिती करावी व गीतकला जोपासावी असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागाने २२सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या”राज्यस्तरीय एकदिवसीय—गीतलेखन कार्यशाळेत”विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गीतकार प्रा.डाॅ.विनायक पवार(डाॅ.पतंगराव कदम काॅलेज,पेण जि.रायगड)यांनी केले आहे.अध्यक्षस्थानी प्रा.डी.एम.शिंदे होते.प्रारंभी प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांचे प्रतिमेचे पुजन केले.

प्रास्ताविक करताना मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डाॅ.शिवाजी गायकवाड म्हणाले की,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गीतलेखन काय असते ?कळावे यासाठी व कार्यशाळेतून गीतकार निर्माण व्हावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

 यावेळी प्रा.शांतीनाथ घोडके,प्रा.डाॅ.एस.एस.फुलसागर,संगीतकार खंडू जगदाळे,विशाल सर उपस्थित होते.सूञसंचालन प्रा.अरविंद हंगरगेकर यांनी केले .कार्यक्रमाला प्रा.सौ.ऊस.एस.फुलसागर,प्रा.वैशाली बोबडे यांनी सहकार्य केले.आभार प्रा.राजा जगताप यांनी मानले.या कार्यशाळेत राज्यभरातील २९२विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.


 
Top