लोहारा / प्रतिनिधी :-
लोहारा तालुक्यात सततच्या पावसामुळे तसेच गोगलगाय यामुळे झालेले खरीप पिकाचे नुकसानीची पाहणी महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केली.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेली सोयाबीन, उडीद,मूग, आदि, पिकांची पाहणी करुन डवले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कृषी सहाय्यक दिपक जाधव यांनी पिकाचे झालेले नुकसान या विषयी माहिती दिली. यावेळी यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार उमेश, तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, सास्तुर चे कृषी सहाय्यक दीपक जाधव, तलाठी कोकाटे, मंडळ अधिकारी साळुंखे, मंडळ कृषी अधिकारी तराळकर, ग्रामसेवक बिराजदार, विस्तार अधिकारी निंबाळकर, डी.बी.सुतार, विश्वास पुरणे, राजवर्धन पाटील, श्रीकांत बाबळसुरे, मधुकर सुतार, विकास पांचाळ, शांतेश्वर स्वाम, तमा माळी, गुरुलिंग औसेकर, महादेव माळी, गोविंद सुतार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.