परांडा / प्रतिनिधी :- 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.महेशकुमार माने यांची महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी नियुक्ती केली आहे .सदर नियुक्ती ही तीन वर्षासाठी असणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

  यावेळी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अक्षय घुमरे, प्राणीशास्त्री विभाग  प्रमुख डॉ अतुल हुंबे ,ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ राहुल देशमुख, प्राध्यापक डॉ सचिन चव्हाण, प्रा जगन्नाथ माळी ,शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभने आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी डॉ महेशकुमार माने यांना शुभेच्छा .दिल्या महाविद्यालयाचे कामकाज प्रामाणिकपणे कराल अशी इच्छा व्यक्त केली. सत्कारास उत्तर देताना डॉ.महेश कुमार माने म्हणाले की संस्थेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यास मी थोडाही तडा जाऊ देणार नाही.संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील नाना शिंदे ,माजी प्राचार्य डॉ.दीपा सावळे ,महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.


 
Top