उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यात आणि देशात विविध उपक्रमांचा उत्साह ओसंडून वाहत असताना त्यात उस्मानाबाद जिल्हाही मागे राहिला नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित केलेल्या प्रभात फेरी, सायक्लोथॉन आणि वृक्षारोपन यात विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रभात फेरीतील विद्यार्थ्यांच्या “भारत माता की जय”, “वंदे मातरम”च्या घोषणांनी संबंध शहर दुमदुमल्याने संबंध शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी फडकवलेल्या तिरंग्याने त्यात आणखीच भर घातली असून नागरिकांच्या घरांवर तिरंगा डौलाने फडकत आहे.


 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या प्रचार प्रसिध्दी आणि जाणीव जागृतीसाठी आज उस्मानाबाद शहरामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे प्रभात फेरी, सायक्लोथॉनसह आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.प्रभात फेरी व सायक्लोथॉनची सुरुवात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी हिरवा ध्वज दाखवून श्री.तुळजाभवानी क्रीडा संकुलातून केली.

 यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जि.प चे अप्पर मुख्यकार्यकारी अधिकारी विलास जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी(रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश कोरडे,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के पाटील, जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) गजानन सुसर,जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) ए.बी मोहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, तहसीलदार गणेश माळी, प्रमोद पांडे,आदींसह शिक्षक,मुख्याध्यापक,अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

 
Top