उस्मानाबाद / प्रतिनिधी -

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहरातून आज (दि.10) भव्यदिव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शहर व ग्रामीण मंडळातील युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तरुणाईच्या या उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण रॅलीच्या माध्यमातून शहरात देशभक्तीचा उत्साह दिसून आला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत देशभरात हर घर तिरंगा उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट दरमयान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकाऊन भारतीय स्वतंत्रयाचा अमृत महोत्सवा निमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी व प्रत्येक नागरिकांपर्यंत हा संदेश पहोचविण्यासाठी या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात आमदार राणाजगजितसिंहजी पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा मा.विधान परिषद सदस्य सुजितसिंहजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रखर राष्ट्र भावना, राष्ट्र प्रेम व सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता वाढण्यासाठी आज धाराशिव शहरात भव्यदिव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम, इनक्लाब जिंदाबाद, हमारी आन बान शान तिरंगा या जय घोषाने व राष्ट्र भक्तीने संपुर्ण शहर दणानुन गेले. 

ही बाईक रॅली धाराशि शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालय प्रतिष्ठान भवन येथून सुरु करण्यात आली व ही रॅली आर्य समाज चौक, राष्ट्रमाता जिजाऊ चौक, महात्मा बसवेश्वर चौक, राजमाता जिजाऊ उद्यान, देशपांडे स्टॅन्ड, काळा मारुती चौक, जिल्हाधिकारी निवासस्थान, संत गाडगेबाबा चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरुन हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या रॅलीची सांगता राष्ट्रगीत म्हणुन करण्यात आली. तिरंगा बाईक रॅली धाराशिव जिल्हयामध्ये तुळजापुर, भुम या ठिकाणीही काढण्यात आली.

या तिरंगा रॅलीमध्ये माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, इंद्रजित देवकते, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, नगरसेवक युवराज नळे, व्यंक्टेश कोरे, बापू पवार, प्रविण पाठक, दत्ता पेठे, दाजीआप्पा पवार, जिल्हा सचिव संदीप कोकाटे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अभिराम पाटील, कुलदीप भोसले, जिल्हा उपाध्यक्ष रोहीतराज दंडनाईक, प्रितम मुंडे, राज निकम, गणेश येडके, सुरज शेरकर, गणेश इंगळगी, भाजपा विद्यार्थी संयोजक विशाल पाटील, युवामोर्चा तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुजित साळुंके, आत्मनिर्भर जिल्हा संयोजक सचिन लोंढे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमित कदम, स्वप्नील नाईकवाडी, राहुल शिंदे, भाजपा शहर उपाध्यक्ष अमोल राजेनिंबाळकर, संदीप इंगळे, पंकज जाधव, शेषेराव बप्पा उंबरे, मेसा जानराव, रोहीत देशमुख, भाजपा शहर सरचिटणीस विनोद निंबाळकर, प्रविण सिरसाठे, नरेन वाघमारे, अलीम शेख, बालाजी जाधव, गणेश मोरे, महेंद्र शिंदे, कुणाल व्हटकर, गिरीष पानसरे, अमोल पेठे, महेश बागल, मोहन मुंडे, पृथ्वीराज दंडनाईक, आदित्य पाटील, पदमाकर शेरखाने, प्रकाश तावडे, वैभव हंचाटे, निलेश भोसले, सुशांत सोनवणे, श्रीराम मुंबरे, पंडीत मंजुळे, अतुल चव्हाण, ‍विनायक कुलकर्णी, लक्ष्मण माने, युवा मोर्चाचे हिम्मत भोसले, राज नवले, ज्ञानेश्वर पडवळ, अमरसिंह पडवळ, गणेश सुर्यवंशी, तेजस सुरवसे, प्रशांत पडवळ, अजित खापरे, गणेश बापु सुर्यवंशी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, गणेश पवार, बाळु सुर्यवंशी, मुकुंद सुर्यवंशी, शंकर मोरे, मनोज ठाकुर, निरंजन जगदाळे, काशिनाथ राजपुत, अजय उंबरे, प्रसाद मुंडे, सलमान शेख, अर्जुन पवार, ज्ञानेश्वर सुळ, रविंद्र परदेशी, जगदिश जोशी, अजय सपकाळ, सुशांत लोकरे, सागर दंडनाईक, विकास पवार, सार्थक पाटील, दादुस गुंड, किशोर पवार, मनोज डोलारे, प्रविण माळी, विवेक कापसे, अतुल कावरे, सागर पवार, लल्लन साळुंके, अविनाश शेरकर, श्रीनिवास शेरकर, स्वप्नील पाटील, सतिश जाधव, अजित सावंत, सुजित पडवळ, शाम तेरकर, संदील भोसले, बालाजी शेरकर, श्रीकांत तेरकर, महेश लांडगे, ऋषी महाजन, अजिंक्य मुंडे, संग्राम बनसोडे, गणेश झांबरे, अजिंक्य जगताप, अक्षय भालेराव, शुभम कदम, बबलु शेख, सिध्देश्वर गवळी यांच्या सह मोठया प्रमाणात युवा मोर्चाचे कार्यकर्ते यावेळी  उपस्थित होते.

 
Top