उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीचा मोबदला समृध्दी महामार्ग व पालखी महामार्गासाठी संपादित मावेजाप्रमाणे मिळावा यासाठी मंत्री नितीन गडकरी यांची खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट घेऊन मांगणी केली.
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक परिवहन विकास मंत्री नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेवून सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीसाठी समृध्दी महामार्ग व पालखी महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या मावेजाप्रमाणे मावेजा मिळावा यासाठी विनंती केली आहे.