उस्मानाबाद / प्रतिनिधी 

तालुक्यातील बेंबळी येथे दक्षता फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ठ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ बैल पोळ्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 शेतात अहोरात्र राबवणाऱ्या बैलांचाही सन्मान होण्यासाठी दक्षता फाउंडेशनच्या वतीने बैल पोळ्याचे औचित्य साधून उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये उत्कृष्ट पालनपोषण करण्यात आलेले, सजावट करण्यात आलेले तसेच शिस्तबद्ध पोळ्याची मिरवणूक काढण्यात आलेल्या बैलजोडीला उत्कृष्ट बैलजोडी म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५१०० रुपये असून आकाश अण्णासाहेब कसबे याच्या वतीने हे दिले जाणार आहे. जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे संचालक यांच्या वतीने ३१०० रुपयांचे द्वितीय तर  शालेय विद्यार्थी मालोजीराजे रणजीत बरडेच्या वतीने तृतीय पारितोषिक २१०० रुपये देण्यात येणार आहे. स्पर्धेचे निरीक्षक म्हणजे पशुधन विकास अधिकारी डॉ. के. व्ही. सुतार,  कृषी सहाय्यक अजित बरडे, प्रगतशिल शेतकरी गोविंद शिडूळे,  गणपत सोनटक्के काम पाहत आहेत. बुधवारी गणेश चतुर्थीला पारितोषिक देण्यात येणार आहेत. याचे उद्धघाटन मोहन पाटील, अॅड. अतुल पाटील, दक्षता फाउंडेशनचे अध्यक्ष गालिब पठाण, उपाध्यक्ष नितिन खापरे, सचिव शामसुंदर पाटील, सहसचिव गुड्डू सोनटक्के, कोषाध्यक्ष सुनिल वेदपाठक, संकल्पक रणजित बरडे, विश्वस्थ अमर कटके, गोविंद पाटील, बालाजी माने, नंदकुमार मनाळे, आतिक सय्यद आदी उपस्थित होते.


 
Top