उस्मानाबाद / प्रतिनिधी-

न्यू भारतीय टायगर सेनेच्या वतीने उस्मानाबाद  शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक  काढण्यात आली. यावेळी प्रतिमेचे   बालाजी मायकल , अशोक  बनसोडे, अभिमान पेठे, शैलेश देव, मारुती लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली ही मिरवणुक  अडत लाईन समोर ते साठे  चौक,गणेश नगर,खाजा नगर,ते,एम,के,पर्यंत काढुन वेळेत नियमांच पालन करीत मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. 

  या मिरवणुकीचे पूर्ण नियोजन न्यू भारतीय टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर लोंढे यांनी केले होते. या मिरवणुकीला 22 वर्षांमध्ये पोलीस प्रशासनाचे व जिल्हा प्रशासनाचे आतापर्यंत शांततेचे नऊ  पुरस्कार देऊन न्यू भारतीय टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर लोंढे यांना सन्मानित केलेली आहे.   मिरवणूक शांततेत निघावी यासाठी सतत सतर्क राहिल्यामुळे  पोलीस प्रशासनाचेही प्रभाकर लोंढे यांनी आभार मानले.

 
Top