उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विधानपरिषद आमदार, सुप्रसिद्ध नेते, संग्राम संघटनेचे अध्यक्ष श्री विनायकजी मेटे यांचा अतिशय धक्कादायक, दुःखदायक निधन झाले आहे .ते अखेरच्या प्रवासाला ते गेलेले आहेत .विधानपरिषदेची उपसभापती या नात्याने मी त्याल”त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. 

विधानपरिषद सभागृहात झुंजार तोफ अशा पद्धतीने मराठा समाजाच्या प्रश्नावर तसेच विविध मुद्यांवर भूमिका मांडत असत. 

त्यांच्या माझा अनेक वर्षांचा चांगला परिचय होता सभागृहात आम्ही एकत्र काम करत होतो. या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांनी अनेक प्रश्नांच्या वरती आवाज उठवला तसं त्यांना न्याय देण्याचे त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आणि विनायकराव मेटे यांचा १९९२-९३ च्या सुमारास चांगल्याप्रकारचा संवाद होता. बर्याच  वेळेस त्यांची बाळासाहेबांशी त्यांच्याशी चर्चा होत असे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या समवेत सुसंवाद होता अनेक वेळेला चर्चा होत होता.

श्री. विनायकराव मेटे यांच्या निधनाने एक प्रचंड असा धक्का महाराष्ट्राला बसलेला आहे. ज्या प्रश्नांसाठी श्री मेटे लढत होते त्या प्रश्नांना आमचं सगळ्यांचं सहकार्य होतच व कायमच राहिल. 

विधान परिषदेच्या माध्यमातून त्या प्रश्नांना न्याय देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करूच हीच श्री मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.


 
Top