उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.टी. पाटील संगणक शास्त्र महाविद्यालयात यापूर्वी बी.एस्सी कम्प्युटर सायन्स (बी.सी.एस.) हा पदवी अभ्यासक्रम व एम.एसी कम्प्युटर सायन्स (एम.सी.एस.) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होता. शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये महाविद्यालयाने बी.सी.ए अभ्यासक्रमासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला होता परंतु विद्यापीठाने  सदरील प्रस्ताव नाकारला होता त्त्या विरोधात संस्थेने विद्यापीठ व शासन विरोधात उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केली होती या याचिकेची सुनावणी दोन महिन्यापूर्वी झाले असून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी सदरील प्रस्ताव शासनास पाठवला व शासनाने सदरील महाविद्यालयास बी.सी.ए. या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी परवानगी दिली आहे. या नवीन अभ्यासक्रमासाठी 12 वी उत्तीर्ण कला/वाणिज्य/ विज्ञान/ 12 वी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकतो व प्रवेशासाठी अंतिम मुदत 30/08/2022 आहे. ज्या विद्यार्थ्यांना बी.सी.ए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी महाविद्यालयास तात्काळ भेट द्यावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित मसलेकर यांनी केले आहे.या नवीन महाविद्यालयाच्या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर के पाटील सरचिटणीस सौ.प्रेमाताई पाटील प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य सुधीर पाटील, संस्था सदस्य श्री.संतोष शंकरराव कुलकर्णी,  यु. व्हि. राजे आदींनी प्राचार्य डॉ.अजित मसलेकर यांचे अभिनंदन केले.

 
Top