परंडा / प्रतिनिधी : -

परंडा तालुक्यातील साकत [ बु ] येथे दि.१७ रोजी कृषी विभागाच्या वतीने महिला शेती शाळा संपन्न झाली.प्रारंभी अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रगीत समुह गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

महिला शेती शाळेत महिलांना शेती विषयी माहिती देण्यात आली.उडिद पिकां विषयी महिलांना कृषी सहाय्यक एस.के.गुंड यांनी मार्गदर्शन केले . शेती बरोबर महिलांनी जोड व्यवसाय कसा करावा , आपला आर्थिक बाजू कशी मजबूत होईल , शेती चा विकास कसा साधता येईल सेंद्रीय खताचा वापर या विषयी अनमोल मार्गदर्शन कृषी सहाय्यक एस. के. गुंड यांनी केले.कार्यक्रमासाठी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या तालुका समन्वयक नौशाद शेख,गट समन्वयक अनिता ठोसर,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक झगझाप ,अंगणवाडी सेविका राणी लोमटे ,लिडर रागिणी सावंत,संदिप जाधव,दत्ता फरतडे यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

 
Top