उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अधिपत्याखाली छत्तीसगड राज्य ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने पश्चिम विभागीय राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या संघ व्यवस्थापक पदी उस्मानाबाद जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोराबोले यांची निवड झाली आहे.

या स्पर्धा 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान रायपूर येथे होणार असून राज्य संघटनेचे सचिव सतीश उचिल यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

 याबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप, संजय देशमुख, अभय वाघोलीकर, राजेश भवाळ, प्रवीण गडदे, समीर बावीकर, रामकृष्ण खडके, संजय कोथळीकर, राजेंद्र सोलनकर, राजेश बिलकुले, माऊली भुतेकर, कुलदीप सावंत, अनिल भोसले, अजिंक्य वराळे, राम भुतेकर आदींनी अभिनंदन व राज्य संघास शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top