वाशी/ प्रतिनिधी-

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील कनिष्ठ विभागातील  प्रा.भरत जगताप हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे यावेळी वाशी चे जेष्ठ नागरिक व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. मच्छिंद्र तात्या कवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच प्रा.विजयकुमार भांजे, प्रा.शहाजी चेडे हे मंचकावर उपस्थित होते. 

यावेळी प्रमुख पाहुणे, सत्कारमुर्ती प्रा.भरत जगताप व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विचार मांडले. सेवानिवृत्ती बद्दल प्रा.भरत जगताप यांना पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देण्यात आले कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गपाट श्रीकांत सर यांनी केले,  प्रास्ताविक प्रा.विजयकुमार भांजे यांनी केले व आभार प्रा. शहाजी चेडे यांनी मानले.


 
Top