उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पुणे येथील समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज कंपनीत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांची रक्कम व्याजासह परत देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण किसान सेनेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा १४ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला.

ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. त्यानुसार संबंधित गुंतवणूकदारांना रक्कम परत मिळण्यासाठी किसान सेना व गुंतवणूकदारांनी उमरगा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर १७ ऑगस्टला मोर्चा काढला होता.

ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. त्यानुसार संबंधित गुंतवणूकदारांना रक्कम परत मिळण्यासाठी किसान सेना व गुंतवणूकदारांनी उमरगा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर १७ ऑगस्टला मोर्चा काढला होता.

२३ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची भेट घेत बीयुडीएस अ‍ॅक्ट २०१९ ची अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांच्या तक्रारी त्या-त्या पोलीस ठाण्यात नोंदवून घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मकता दर्शविली होती. त्या अनुषंगाने शासन व प्रशासन स्तरावरुन तत्काळ कारवाई व्हावी व गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यावसायिक यांनी गुंतवणूक केलेली सुमारे १५ हजार कोटी रुपयांची रक्कम गुंतवणूवकदारांना मिळावी, अन्यथा या मागणीसाठी १४ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर मनसे किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष शाहुराज माने, रणजितसिंग राजपूत, सुनील भालेराव, प्रदीप बिराजदार, एल.सी. मोरे, सुग्रीव पाटील, ज्ञानोबा देशपांडे, प्रशांत गरड, महादेव भोसले, रोहित गुरव, विलासराव देशमुख, अजय पवार आदींची सही आहे.


 
Top