तुळजापूर / प्रतिनिधी - 

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवार दि.२६ सप्टेबर 2022रोजी घटस्थापनेने आरंभ होणार आहे. शारदीय नवराञोत्सव पुर्वीच्या मंचकी निद्रेस शनिवार दि.१७रोजी राञी आरंभ होणार आहे तर या सोहळ्याचा सांगता    पोर्णिमा दिनी सोमवार दि.१० आँक्टोबर रोजी होणार आहे.

  प्रतिवर्षाप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर तर्फे यंदाच्या शारदीय नवराज महोत्सवात या प्रमाणे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये  सोमवार दि. २६ रोजी घटस्थापना, मंगळवार दि.२७ रोजी नित्यापचार पुजा रात्री छबिना, बुधवार दि.२८ नित्यापचार पुजा रात्री  छबिना, गुरुवार दि.२९ रोजी रथअलंकार महापुजा रात्री छबिना, शुक्रवार दि.३०रोजी ललित पंचमी मुरलीअलंकारपुजा व राञी छबिना, शनिवार दि.१ रोजी शेषशाही अलंकार राञी छबिना,  रविवार दि.२ रोजी भवानी तलवार व राञी छबिना, सोमवार दि.३ रोजी दुर्गाष्टमी महिषासुरमर्दिनी अलंकार पुजा राञी ११.३०वैदिक होमास आरंभ व दुपारी ४.४५वा.पुर्णाहुती राञी छबिना, मंगळवार दि.४ रोजी महानवमी देविजींची नित्योपचार पुजा दुपारी १२वा. होमावर धार्मिक विधी.घटोत्यापन व राञी नगरहुन येणाऱ्या पलंग पालखी मिरवणूक.बुधवार दि ५  रोजी उषाःकाली श्रीदेवीजींचे शिबीकारोहन  विजयादशमी (दसरा) सिमोल्लंघन मंदीराभोवती मिरवणूक व मंचकीनिद्रा रविवार दि.९ रोजी कोजागिरी पौर्णिमा “ म्हणजे दिनांक 10/10/2022 रोजीचे पहाटे श्रीदेविजींची सिहासनावर प्रतिष्ठापना , सोमवार दि १० “ मंदिर पौर्णिमा “ श्री देविजींची नित्योपचार पुजा , रात्री सोलापूरच्या काठ्यांनसह छबीना व जोगवा. 


 
Top