उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद नगरपरिषदचे भ्रष्ट मुख्याधिकारी येलगटे यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे राज्य समिती सदस्य अॅड.अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद समोर भंगाराचे साहित्य गाड्यावर नेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष राहुल माकोडे, उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, जिल्हा सचिव मुन्ना शेख, कोषाध्यक्ष विकास वाघमारे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष राजपाल देशमुख, तुळजापूर तालुका अध्यक्ष मधुकर शेळके, कळंब तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब खिचडे नळदुर्ग शहराध्यक्ष वसीम खान पठाण व इतर आम आदमी पार्टीचे सहकारी आदींनी भाग घेतला होता.