उस्मानाबाद / प्रतिनिधी : 

पिक विम्याच्या अगाऊ व अग्रीम २५% नुकसान भरपाई साठी व वैयक्तिक तक्रारींच्या अनुषंगाने पंचनामे सुरू , असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. 

जिल्ह्यातील अनेक भागात गोगलगाय, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे व गोगलगाय/ येल्लो मोझाईक प्रादुर्भावामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकार खास बाब म्हणून नविन निकषांप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे, त्यानुसार वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर झाला आहे. या उपरी काही पंचनामे राहिले असल्यास संबंधित तलाठी अथवा तहसीलदार यांच्याकडे संपर्क साधावा. या आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी निकषा पेक्षा दुप्पट रक्कम शासनाने जाहीर केली आहे.

 खरीप २०२१ मध्ये देखील प्रत्यक्ष नुकसानीच्या केवळ ५० टक्केच पिक विमा मिळाला असून उर्वरित पीक विमा देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश विमा कंपनीने मान्य केले नाहीत.  या अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी प्रधान कृषी सचिव यांच्याशी केलेल्या चर्चे नुसार विमा कंपनीवर दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना प्रधान कृषी सचिव यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. याबाबत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


 
Top