उस्मानाबाद / प्रतिनिधी-

या वर्षीचा स्वातंत्र्य दिवस हा देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा होतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्याचे जाहीर केले आहे. या अभियानात जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आपल्या क्षेत्रात कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

 हर घर तिरंगा अभियानात सर्व शासकीय कार्यालये कर्मचारी, संघटना,स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन मा.पंतप्रधानांनी केले आहे,याला प्रतिसाद देत देशभरात  शाळा महाविद्यालयात, शासकीय कार्यालयात महिला मंडळ अशा सर्व स्तरांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानुषंगाने भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने प्रभातफेरी, मोटारसायकल रॅली,महिला मोर्चाच्या वतीने रॅली,रांगोळी स्पर्धा,व्याख्यान असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत जिल्हाध्यक्ष नितीन काळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली.या बैठकीला,खंडेराव चौरे, सुनील काकडे, युवराज नळे,अभय इंगळे,प्रविण पाठक, राजाभाऊ पाटील, इंद्रजीत देवकते,गिरीष पानसरे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top