उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मध्यप्रदेशातून सोलापूरकडे जाणारे दोन ट्रक चौसाळा शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर  सायंकाळी चालकांनी विश्रांतीस थांबवले होते. रात्री   चालक लघवीस उठला असता त्या दोन्ही ट्रकच्या इंधन टाकीची झडप व कुलूप तोडून प्रत्येकी 200 लि. डिझेल चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी वाशी पो.ठा. गाठून भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा क्र. 164/ 2022 हा नोंदवला आहे.

   तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- प्रकाश औताडे, जावेद काझी, पोना- शौकत पठाण, रंजना होळकर, पांडुरंग मस्के यांच्या पथकाने दि. 20 ऑगस्ट रोजी गोपनीय खबरे आधारे विशाल काळे, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब यास अटक करुन नमूद चोरीतील सुमारे 125 लि. डिझेल असलेले 7 कॅन जप्त केले असून पोलीस त्याच्या उर्वरीत साथीदारांचा शोध घेत आहेत.


 
Top