उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडून डॉ. शिवाजी रामराव चव्हाण यांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी हे संशोधन नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुराधा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली “ उस्मानाबाद जिल्ह्यातील दर्जावाढ मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या गणित विषय अध्यापनाच्या परिणामकारकतेचा अभ्यास ” या नावीन्यपूर्ण विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवर्धनवाडी नंबर एक येथे प्राथमिक पदवीधर पदावर कार्यरत असलेले डॉ. शिवाजी चव्हाण हे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकातून शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवणारे ते पहिले प्राथमिक शिक्षक ठरले आहेत. पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

  उत्कर्ष परिवार उस्मानाबादच्या वतीने भारत स्काऊट गाईड कार्यालयात डॉ. शिवाजी चव्हाण यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  शिक्षण उपसंचालक (लातूर) डॉ. श्री. गणपत मोरे यांच्या हस्ते डॉ. चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

 यावेळी उस्मानाबाद डायटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, डॉ. बा. आ.म. विद्यापीठ उपपरिसरचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.महेश्वर कळलावे,  रामलिंग काळे, जिल्हा संघटक जिल्हा स्काऊट गाईड कार्यालयाचे विक्रांत देशपांडे, एल. बी. पडवळ सर, शिक्षक नेते बशीर भाई तांबोळी, पिसे सर, काझी साहेब, थेटे सर , जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव, यरमुनवाड सर, डॉ. चव्हाण यांच्या मातोश्री कावेरीबाई चव्हाण, पत्नी सौ. सुजाता चव्हाण, उत्कर्ष परिवार आणि डॉ. चव्हाण यांच्यावर प्रेम करणारे मित्र स्नेही केंद्रप्रमुख  जाकते सर, नागले सर, नागतीलक सर आणि शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती यरमुनवाड आणि सौ.रजनी गुरव यांनी केले तर,  विजय माने सर यांनी काव्यमय स्वरुपातून भावना व्यक्त करून सर्वांचे आभार मानले


 
Top