उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत व दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणे (ADIP) योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत आवश्यकतेनुसार मोफत उपकरणे देण्यासाठी आ.राणाजजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद शहरातील जिल्हया रुग्णालयात शिबिर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील दिवयांगतव आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगाना सहाय्यक ठरणारी उपकरणे देण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या शिबीरात एकुण ५७० दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांनी नोंदणी केली.

 यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, अभय इंगळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, राहुल काकडे, सचिन तावडे, प्रविण सिरसाठे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, प्रविण पाठक, नरेन वाघमारे, अमोल पेठे, ॲड.कुलदिप भोसले, प्रितम मुंडे, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, संदिप इंगळे, सुजित साळुंके, सलमान शेख, जगदिश जोशी, सुनिल पंगुडवाले, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष समाधान मत्ते, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड, प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, प्रा.पी.एस.तांबारे, बाळु देवकर, स्वानंद पाटील, मुश्ताक शेख, डि.आर.जाधव, नागेश फुलसुंदर, किरण चिंचोले, खंडु शिंदे, दत्ता बोर्डे, आंगद गिराम, मिथुन मजगे, संजय शिंदे, अमोल वाघमारे, बप्पा वाघमारे, शशांक माळवदकर, पुजा घोडके, संजय गायकवाड, मिनाक्षी चव्हाण, प्रणाली वाळके, आदि, उपस्थित होते. या शिबिरात कृत्रीम अवश्यक तज्ञ डॉ. काजल खाडे, डॉ.राजश्री भेंडे, डॉ.प्रिया वर्मा, डॉ. गुलशनकुमार गुप्ता, सृजन भालेराव, डॉ. निरजकुमार मोरये, विवेक कांबळे, वैद्यकीय समन्वयक डॉ.परविन सय्यद तेरणा जनसेवा केंद्र उस्मानाबाद, डॉ.ईरफान शेख, डॉ.राजु गायकवाड, आदिंनी तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांनी परिश्रम घेतले.


 
Top