वाशी/ प्रतिनिधी-

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 25 ऑगस्ट 2022 ते 08 सप्टेंबर 2022 या कालावधीत “ तुमचे डोळे जगु द्या “ या घोषवाक्यानुसार 37 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ ग्रामीण रुग्णालय वाशी चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच नेत्र तपासणी स आलेल्या रुग्णांनी नेत्रदानाचे संमती पत्र भरून नेत्र चिकीत्सा अधिकारी श्री. मनोज डांगे यांच्या कडे देण्यात आले. यावेळी डॉ. महावीर कोटेचा, डॉ. कुलकर्णी सर, डॉ. गरड सर, कार्यक्रमास उपस्थित होते. 

       तसेच या पंधरवडा निमित्ताने मांडवा व गोजवाडा येथे नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करुन मांडवा येथे 132 व गोजवाडा येथे 75 नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात 10 रुग्णांची मोती बिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तसेच सदरील शिबीरात उच्च रक्तदाब, मधुमेह व एचआयव्ही या विषयावर जनजागृती करुन तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी नेत्र चिकीत्सा अधिकारी श्री.मनोज डांगे, समुपदेशक श्री. परमेश्वर तुंदारे, श्री. उत्तरेश्वर उबाळे, प्रयोग शाळा तंत्रज्ञ श्री. संतोष बुधोडकर, मांडवा येथील डॉ. मगर मॅडम, श्री. जोगदंड व गोजवाडा येथील डॉ. पाटील मॅडम, श्रीमती सोमासे  सिस्टर यांनी परिश्रम घेतले.


 
Top