उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 धाराशिव तालुक्यातील कावळेवाडी येथे अर्थसंकल्प 2021-22 मधून किंमत रु. 4 कोटी 80 लक्ष, मातोश्री पाणंद रस्ते 24 लक्ष  व आमदार श्री. कैलासदादा पाटील यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत 12 लक्ष अशा एकुण 5 कोटी 16 लक्ष च्या कामाची उद्घाटने मा. खा. श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व मा. आ. श्री. कैलासदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

 याप्रसंगी बोलताना सद्या आम्ही जरी विरोधी बाकावर असलो तरी जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव आवाज उठवत राहणार असल्याचे खासदार राजेनिंबाळकर यांनी म्हटले तसेच राज्यामध्ये केवळ 2.5 वर्ष ठाकरे सरकार होते त्या काळामध्ये कोरोनामूळे पुर्णपणे टाळेबंदी असतानासुद्धा एवढ्या कमी कालावधीमध्ये मतदार संघासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणला.

यावेळी पंचायत समिती सदस्य श्री. संग्राम देशमुख, श्री.अण्णासाहेब तनमोर, श्री. पांडुरंग माळी, गुणवंत कावळे, चिंतामणी कावळे, अच्युत महाराज खोत, मुस्ताफा भाई, मेघराज कावळे, बबन कावळे, बंकट जराड, रामेश्वर वीर व शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.

 1.  कावळेवाडी-बुकनवाडी-कोळेकरवाडी-म्होतरवाडी-भिकार सारोळा रस्ता (कामाची किंमत 3 कोटी)

 2.      बुकनवाडी रस्त्यावरील पुल (किंमत १ कोटी ८० लक्ष)

 3.      कावळेवाडी ते तेर पानंद रस्ता (किंमत २४ लक्ष)

 4.       आमदार कैलास पाटील यांच्या आमदार निधीतून एकूण 12 लक्ष त्यामध्ये

 1.  कावळेवाडी ते देवळाली रस्तावरील पूल  (किंमत ६.०० लक्ष)

   2. शेत रस्त्यावरील पुल (किंमत ६ लक्ष)


 
Top