उस्मानाबाद / प्रतिनिधी-

औरंगाबाद येथील मराठावाडा महसुल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे दि.२८ ऑगस्ट रोजी देवगिरी प्रांत संस्कार भारती औरंगाबाद समिती आयोजित एक दिवशीय साहित्य संमेलन संपन्न झाले. विविध ग्रंथ संविधानासह पुजन करुन ग्रंथदिंडीने सुरुवात झाली . 

उद्‌घाटन समारंभास प्रसंगी  संमेलनाध्यक्ष तथा संस्कार भारती देवगिरी प्रांत अध्यक्ष भारत लोळगे, जेष्ठ साहित्य डॉ. सुधीर रसाळ  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद कुलगुरु प्रा.डॉ. प्रमोद येवले, प्राचार्य रा.रं. बोराडे, डॉ . मंगला वैष्णव,डॉ. प्रभाकर देव , बाबा भांड , देवगिरी प्रांत महामंत्री डॉ. जगदीश देशमुख आखिल भारतीय संस्कार भारतीचे रवींद्र बेडेकर संमेलन प्रमुख तथा देवगिरी प्रांत सह मंत्री विश्वनाथ दाशरथे उपस्थितीत संपन्न झाले. परिसंवादात सहभागी डॉ. विद्यासागर पाटांण कर , प्रकाश पाठक, नयना कासखडीकर , विधीज्ञ श्रीकांत उमरीकर परिसंवादानंतर जेष्ठ साहित्यिका डॉ. मंगला वेष्णव यांची प्रा. स्नेहल पाठक यांनी घेतली बाल नवकवीसाठीचे सत्र रत्नाकर रानडे, प्रशांत गौतम, डॉ. विनोद सिनकर यांनी मार्गदर्शनपर सत्र घेतले २० कवींच्या संमेलनाचे संमलेनाध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांनी भुषविले संमले न समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर ह्या होत्या संमेलनाचे आभार प्रदर्शन जयंत शेवतेकर या एक दिवशीय साहित्य संमेलनासाठी देवगिरी प्रांतातील विविध समितीतील पदाधिकाऱ्यासह जिल्हा संस्कार भारती समिती देवगिरी प्रांत लोककला विधाप्रमुख डॉ. सतीश महामुनी , प्रांत सहचित्र कला विधा प्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ वाघ,जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी जिव्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे - सुंभेकर , तुळजापूर शहर संयोजन समिती अध्यक्ष प्रफुल कुमार शेटे संमेलनास आदी उपस्थिती होती. 


 
Top