तुळजापूर / प्रतिनिधी :- 

तालुक्यातील सावरगाव येथे ग्रामदैवत नागनाथ महाराज यात्रोत्सवास गुरुवार(दि.२८) रोजी आषाढ अमावस्या पासून सुरुवात झाली असून गेल्या तीन दिवसापूर्वी नाग पाल विंचू यांचे मंदीर परीसरात आगमन झाले , नागनाथ महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी तसेच कट्टर शत्रू असलेल्या नाग पाल विंचू यांना एकत्रित  पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

यात्रेच्या चौथ्या दिवशी रविवार (दि.३१)रोजी मंदिराचे  मुख्य पुजारी कल्याण स्वामी यांच्या  भजनाच्या गजरात सकाळी सहा वाजता मिरवणूक काढण्यात आली, मारुती मंदिरात मुख्यपुजारी कल्याण स्वामी महाराज यांच्या साक्षीने तेथील नागनाथ महाराजांची महाआरती करण्यात आली , मिरवणुकीवेळी गावात जागोजागी भाविक कल्याण स्वामी  महाराजांचे पदपूजन  करत होते, भजनाच्या गजरात मिरवणूक नागनाथ महाराज मंदिर परिसरात पोहचल्यावर मानकरी आण्णासाहेब भालेकर यांनी मुख्य पुजारी कल्याण स्वामी यांचा खौर विधी पूर्ण केला अर्थात केस काढले, तदनंतर मुख्य पुजारी कल्याण स्वामी यांच्या अंगात खरग संचारल्यानंतर खरग  डोहात स्नान घालण्यात आले, परंपरेगत चालत आलेल्या साकी मानकरयांनी म्हणल्या, मंदिरासमोर नागनाथ महाराजांची महाआरती झाल्यानंतर  महाप्रसाद वाटप होवून चौथ्या दिवसाचे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

 यावेळी बंडाप्पा तानवडे,सिद्धेश्वर तोडकरी ,बाळासाहेब तानवडे, महारुद्र अक्कलकोटे , दादाराव अक्कलकोटे ,पिंटू तानवडे ,दत्ता काडगावकर , बसवेश्वर गाभणे,  महेश तानवडे , शुभम अक्कलकोटे ,भारत  कानवले , विजय तानवडे , समाधान डोके, अप्पा डोके, रामलिंग गाभने ,पप्पू तानवडे , राहुल अक्कलकोटे , चंद्रकांत गाभणे, हनुमंत गाभणे , एकनाथ अक्कलकोटे, राम तानवडे , ओंकार काडगावकर , निलेश तानवडे , वैभव तोडकरी , विशाल तोडकरी  , परमेश्वर तानवडे , गणेश तानवडे , योगेश तानवडे , अजय तानवडे , सुरज अक्कलकोटे , अतिश शिंदे , नागेश तानवडे , ओंकार अक्कलकोटे ,प्रा. कानिफनाथ माळी,  गणेश गाभने , गणेश तोडकरी , प्रविण तोडकरी , पप्पू तोडकरी , गणपत तानवडे , रमेश तानवडे ,भारत डोके, संजय कोळी, बब्रूवान भालेकर, राहुल तानवडे , रंजित तानवडे , साई तानवडे , मेघराज काडगावकर , भगवान लिंगफोडे , महेश स्वामी , सागर स्वामी , सोमनाथ स्वामी, धनाजी स्वामी,शशिकांत डोके, यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top