परंडा / प्रतिनिधी :- 

परंडा तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कुल शाळेचे शिक्षक महमंद दाऊत शेख यांचा सेवा निवृत्ती समारोपाचा कार्यक्रम दि.३० रोजी न्यू हायस्कुल शाळेच्या मैदानावर संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जय जवान जय किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य दत्तात्रय पाटील यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव लक्ष्मणराव वारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या कार्यक्रमात महमंद दाऊत शेख यांचा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील व सचिव लक्ष्मणराव वारे आदी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व हार घालून सह कुटुंब सत्कार करण्यात आला .इंग्रजी विषयाचे शिक्षक महमंद दाऊत शेख हे १९८९ साली शाळेवर रुजू झाले होते . इंग्रजी विषयाचा एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती . त्यांनी न्यू हायस्कुल शाळेत ३३ वर्ष इमान इतबारे सेवा बजावली . त्यांना निरोप देताना सहकारी शिक्षक, विद्यार्थी - विद्यार्थीनी ना गहिवरुन आले होते . निरोप समारंभ कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सचिव लक्ष्मणराव वारे यांनी महंमद शेख यांचे तोंड भरून कौतुक करून पुढील भावी आयुष्या साठी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमासाठी जय हनुमान विद्यालय वाटेफळचे प्राचार्य खोबरे , ज्ञानेश्वर विद्यालय तांदुळवाडी चे मुख्याध्यापक पाटील , शेळगांव हायस्कुलचे काळे ,जय जवान जय किसान संस्थेचे कोषाध्यक्ष भोगील ,न्यू हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक वसंत हिवरे, जि. प . शाळा अनाळा चे मुख्याध्यापक साळूंके , माजी उपसरपंच विजयकुमार वानगोता , विठठल बल्लाळ , नारायण सिरसागर , सचिन पाटील , शंकर वरळे, शरद पाटील , भोरे, सपकाळ , खुने, गेजगे , छगन बैरागी , श्रीमती सातपुते आदी शिक्षकासह ग्रामस्थ , पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले तर आभार वरपे यांनी मानले.

 
Top