उस्मानाबाद /प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष  श्री साईनाथ पवार  यांचे नेतृत्वाखाली संघटनेच्या  शिष्टमंडळाने  मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  यांची  निवासस्थानी भेट घेण्यात आली. भेटीवेळी  मुख्यमंत्री यांनी दिव्यांगाप्रती त्यांच्या मनात असलेल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. खुद्द मुख्यमंत्री  यांनी व्यासपीठावरून खाली उतरून, जिथे दीव्यांग बांधव मुख्यमंत्री  यांच्या भेटीची वाट पाहत होते तिथे स्वतः येऊन चर्चा केली आणि दिव्यांगाच्या सर्व अडी अडचणी शांतपणे ऐकून व समजून घेऊन, येत्या नजीकच्या काळात दीव्यांग मंत्रालयाची स्वतंत्र निर्मिती करण्यात येणार असल्याचे संघटनेला आश्वासित केले. तसेच भविष्यात संघटनेच्या विविध उपक्रमात त्यांचे सरकार व ते स्वतः सहभागी होण्याचा यशस्वी प्रयत्न करुन  सर्व दिव्यांगाना या समाजात सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी सर्वसमावेशक योजना कार्यान्वित कार्याबाबत   कटिबध्द राहील असे  आश्वासित केले.

 भविष्यातील येणारा काळ इतर सर्व दिव्यांग बांधव तसेच सर्व दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांचेकरिता सुवर्णकाळ असेल असे  मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे वर्तणुकीतून सर्व उपस्थितांना दाखवून दिले. यावेळी राज्सचिव ललित सोनवणे,राज्य समन्वयक   महादेव शिंदे,  बाबुराव पवार, पद्माकर पाटील, मनोज घोडके, नागनाथ कसपटे, विष्णू बोडखे उपस्थित होते.


 
Top