उस्मानाबाद /प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी (आ), मेंढा, घुगी, नितळी, कोंड व जागजी येथील सततच्या पावसामुळे, गोगलगाय, येल्लो mozak मुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे ‘सततचा पाउस हा निकष ग्राह्य धरून केंद्र सरकारच्या NDRF आणि राज्य शासनाच्या SDRF निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेकरीता SDRF आणि NDRF अंतर्गत सर्व पंचनामे करण्याबाबत संबंधित अधिकारी यांनी शेतकरी बांधवाना मदत होईल अशी भूमिका ठेवावी व एकाही शेतकऱ्याची शेतजमीन पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही ही दक्षता घ्यावी अशा सुचना खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पाहणी दौऱ्यावेळी प्रशासनाला दिल्या व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी APP वर GPS फोटो व सातबारा अपलोड करावे व सतत च्या पावसाने नुकसान झाले असल्याचा तक्रारी अर्ज तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात द्यावा व पोहच घ्यावी.

   खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पुर्ण जिल्ह्याचा दौरा केला असून जिल्ह्यात जवळपास 60 % नुकसान झाले असून या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना झालेल्या पिकांच्या नुकसानी संदर्भात शासनाकडे मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन झोपीचे सोंग घेणाऱ्या शासनास जागे करण्यासाठी व झालेल्या शेतीपिकाची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी सर्वांनी गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी. शासनाने आजपर्यंत मदतीचा कोणताही निर्णय घेतलेला नसून जिल्हाधिकारी यांना मदतीसाठी कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी असे आव्हाण खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पाहणी दौऱ्यादरम्याण केले.

  याप्रसंगी नंदू राजेंनिबाळकर, संचालक संजय देशमुख, उप जिल्हा प्रमुख विजय सस्ते बापू, तालुका प्रमुख सतीश कुमार सोमाणी, मुकेश पाटील, व्यंकट गुंड, सतीश एकंडे, जी बी पवार, सतीश जावळे, बालाजी एकंडे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार माळी, तालुका कृषी अधिकारी जाधव, गट विकास अधिकारी व उप अभियंता यांच्यासह शेतकरी, नागरिक आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

 
Top