उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नगर परिषदेच्या आवारातून भंगार साहित्य चोरी झाल्याचे प्रसार माध्यमातून कळाले यानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी  नगर पालीकेच्या आवारात जावून शहानिशा केली असता चोरी झाल्याचे निर्दशनास आले .  त्यामुळे या भंगार चोरी प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर जे दोषी आढळतील त्यांच्यावर जेरबंद करून गुन्हे दाखल करून   योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी  धाराशिव जिल्हाधि का-यांकडे केली.

  यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भाजपा जिल्हा सचिव संदीप कोकाटे, शहर अध्यक्ष राहूल काकडे, युवा मोर्चाचे  सुजित साळुंके ,माजी नगरसेवक दत्ता पेठे, बापू पवार ,विनोद निंबाळकर, अमोल राजेनिबांळकर,   प्रविण पाठक, मोहन मुंढे, संदिप इंगळे,  सलमान शेख, गणेश एडके, श्रीराम मुंबरे,  रोहित देखमूख, बालाजी मडके, सुनिल पंगुडवाले, प्रसाद मुंढे, धनराज नवले, सार्थक पाटील, जितेंद्र नाईकवाडी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थीत होते.

 
Top