तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील झालेली  अतिवृष्टी व घरांची झालेली पडझड पाहणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार  कैलास द पाटील हे सोमवार दि. ८रोजी  तुळजापूर तालुका दौऱ्यावर येवुन अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देवुन नुकसान झालेल्या शेतींची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. 

 यावेळी त्यांनी  तामलवाडी, पिंपळा, देवकुरुळी कुंभारी, धनेगाव, राखेल या गावाची पाहणी करुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनशी संवाद साधुन मदतीचे आश्वासन दिले.   

 त्यांच्यासोबत श्याम पवार, ऍड गजानन चौगुले, सुनील जाधव मुकुंद गायकवाड, जगन्नाथ गवळी, अमोल घोटकर, कृष्णा घोटकर, सुधीर कदम,चेतन बछगर. बाळासाहेब शिंदे. सौदागर जाधव, श्याम पाटील ,वीरेश डोंगरे, मनोज डोंगरे ,तुकाराम डोंगरे ,आनंद दुलंगे ,आप्पा डोंगरे ,दीपक खोपडे, दत्तात्रय तांबे, नाना कोळी सरपंच  उपसरपंच क्षीरसागर तसेच तहसीलदार तांदळे  , कृषी अधिकारी   जाधव , मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तलाठी आदी उपस्थित होते.


 
Top