वाशी/ प्रतिनिधी 

येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात जागतिक युवा दिन साजरा करण्यात आला.याच कार्यक्रमात अँटी रॅगिंग कायदा याविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कठारे तर प्रमुख पाहुणे म्हणून वाशी दिवाणी न्यायाधीश श्रीमती गायकवाड जे. एस.  उपस्थित होत्या.

याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना  कायदेविषयक  मार्गदर्शन केले.तसेचअॕड. विकास उंद्रे यांनी आजचा युवा हा व्यसनांपासून कसा दूर राहिला पाहिजे व दूर राहण्याचे फायदे काय आहेत हे विचारव्यक्त केले.अॕड.कोठावळे पी.के. यांनी रॅगिंग व त्याविषयी असणारे कायदे व शिक्षा याबद्दल सविस्तर विवरण केले व कायदेशीर माहिती करून दिली. 

याप्रसंगी वाशी विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष  पवार ए. आर, वाशीग्रामीण रुग्णालयाचे   वैद्यकीय अधिक्षक  डॉ.शिंदे हे देखील उपस्थित होते.समुपदेशक परमेश्वर तुंगारे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.

या कार्यक्रमासाठी न्यायालय, ग्रामीण रूग्णालय,महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती नखाते छाया मॅडम यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. अनिता चिंचोलकर मॅडम यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार श्रीमती. सारीका गादेकर मॅडम यांनी मानले.


 
Top