तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील जय शिवाजी तरुण मंडळ व महात्मा फुले युवा मंचाच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अध्यक्षपदी अनिकेत भोजने तर उपाध्यक्षपदी अजय गायकवाड यांची निवड करण्यात आली. मंडळाचे मार्गदर्शक रामेश्वर नन्नवरे व माजी उपाध्यक्ष गणेश नन्नवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली.

सचिवपदी चैतन्य क्षीरसागर व अविष्कार भोजने, कोषाध्यक्ष - शरद म्हेत्रे, चंद्रसेन भोजने तर मिरवणूक प्रमुख पदी सोमनाथ भोजने, बालाजी जाधव, नवनाथ बनकर, गणेश लोले, मुन्ना सुरवसे यांची निवड करण्यात आली. बैठकीला अजिंक्य ननवरे, औदुंबर भोजने, अतुल गायकवाड, श्रावण डोके, प्रदीप जगदाळे, गणेश खारे, तात्या जाधव, रंगनाथ भोजने, विजय नन्नवरे, गणेश भोजने, नीलेश गाटे, अभिजित भोजने, गणेश लोले, प्रदीप भोजने, दया म्हेत्रे उपस्थित होते.


 
Top