वाशी  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील बनगरवाडी  गावासह वाशी  तालुक्यात  कोरोना महामारीनंतर तब्बल 2 वर्षांनी पोळा सण अगदी उत्साहात साजरा करण्यात आला . 

या सणानिमित्त बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलांचे पूजन करून त्यांची धुमधडाक्यात मिरवणूकही काढण्यात आली . एकंदरीत , बँड , हलगीच्या निनादात निघालेल्या बैलांच्या मिरवणुकीत अनेक युवा शेतकऱ्यांनी नाचून आपला आनंद साजरा केला . या वेळी ग्रा प सदस्य सरस्वती बोडके,काँग्रेस ओ बी सी सेल ता आ अमोल बोडके,नानासाहेब बोडके,नितेश बोडके ,बाबा महानवर,बाळासाहेब कदम,मधुकर सलगर यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.


 
Top