उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईभर व परिसरातील शेतकरी अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे हतबल झाले आहेत.
रुईभर शेतकरी तानाजी वसंत जठार व परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर झालेल्या संततधार अतिवृष्टीमुळे सोयाबीच्या बीयाची नासधूस झाली. त्यामुळे सोयाबीनचे बी उगवले नाही. अतिवृष्टी थांबल्यावर गावातील बचत गटांमध्ये 15000 रूपए उचलुन शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. दुबार पेरणी केल्यानंतर कीटकनाशके व गोगलगाय यांनी उगवून आलेले सोयाबीनचे बी सर्व खाऊन टाकले, त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याकडे गंभिरतापुर्वक बघत सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत. दरम्यान नुकसानग्रस्त पिकांची पाहणी माजी उपसरपंच भगीरथ लोमटे, संतोष वडवले, काकासाहेब चव्हाण, सुरेश कलाल शंकर वडवले, आदींनी केली.