उस्मानाबाद /प्रतिनिधी -

आज वाशी तालुक्यातील सरमकुंडी, तांदळवाडी, जवळका  येथील सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राजेनिंबाकर व बोरकर यांनी पाहणी करून तातडीने पंचनामे व निकष सर्वत्र लागू करून SDRF आणि NDRF अंतर्गत सर्व पंचनामे करण्याबाबत संबंधित अधिकारी यांनी शेतकरी बांधवाना मदत होईल अशी भूमिका ठेवावी.शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी APP वर GPS फोटो व सातबारा अपलोड करावे व सतत च्या पावसाने नुकसान झाले असल्याचा तक्रारी अर्ज तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात द्यावा व पोहच घ्यावी असे आवाहन केले.सोयाबीन पिकाचे गोगलगाय व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शंकरराव बोरकर यांनी शनिवारी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली.कुठलेही निकष न लावता सरसकट अनुदान दिले जावे अशी मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख गौतम लटके ,विधानसभा समन्वयक दिलीप शाळू,तालूका प्रमुख विकास मोळवणे,युवा शहर प्रमुख वाशी लायक तांबोळी, शहर प्रमुख अनिल गवारे,वाशी बाळासाहेब उंदरे ,तहसीलदार नरसिंग जाधव, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले ,गट विकास अधिकारी राजगुरू व शेंदरे  उप अभियंता यांच्यासह शेतकरी, नागरिक आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. वाशी तालुक्यातील पारगाव येथे बँक ऑफ महाराष्ट्र येथे बँकेस भेट देऊन पीक कर्ज वितरणा बाबत माहिती घेतली कुठलाही शेतकरी पीक कर्जपासून वंचित राहणार नाही याची दक्षता बँक व्यवस्थापकानी घ्यावी सुचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शंकरराव बोरकर यांनी दिल्या*

 
Top