काटी / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम खेलाजी आगलावे वय (80) वर्षे यांचे सोलापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेले असता त्यांचे उपचापुर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने   निधन झाले. हि घटना शनिवार दि. 13 रोजी दुपारी एक वाजता घडली.

कॉंग्रेस पक्षाचे काटी जिल्हा परिषद गटाचे अजातशत्रू माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सेवा निवृत्त आदर्श शिक्षक मोतीराम खेलाजी आगलावे यांना सामाजिक कार्याची विशेष आवड होती. सदैव समाजकारणात सक्रीय राहुन नवीन पिढीतील लोकप्रतिनिधीना लोकहिताची कामे करण्यासाठी ते नेहमी प्रोत्साहित करीत होते. त्यांच्या अकाली निधनाने काटी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

   त्यांच्या पार्थिवावर शनिवार संध्याकाळी आठ वाजता येथील धामणगाव रोडवरील धनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, तीन विवाहित मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.


 
Top