तुळजापूर  / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण , मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , उस्मानाबाद यांच्या निर्देशानुसार  शनिवार दि१३  रोजी घेण्यात आलेल्या   राष्ट्रीय लोकअदालत मध्ये  दिवाणी फौजदारीचे ९४ प्रकरणे सामपचाराने मिटले तर  धनादेश अनादर प्रकरणी २८०५५३ रुपये दावापुर्व प्रकरणात ८४०९७ वसुली यात झाली.

  प्रारंभी   दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती  एम . एम . निकम यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने लोक अदालतीचे उद्घाटन करण्यात आले  . 

यावेळी श्रीमती पी . एस . जी . चाळकर , सह दिवाणी न्यायाधीश क स्तर ,   के . एस . कुलकर्णी , २ रे सह दिवाणी न्यायाधीश क . स्तर , तुळजापूर , श्रीमती सई भोरे पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी , तुळजापूर , श्री . प्रशांतसिंह मरोड , गटविकास अधिकारी श्री राऊत साहेब सह गटविकास अधिकारी , सरकारी वकील श्री अमोघसिध्द कोरे , अँड . डी . जे . घोडके अध्यक्ष , , श्रीसपोनी  सुशिल चव्हाण . एम . एम . शहा ,  पो नी सचिन पंडीत , पोलीस निरीक्षक , तामलवाडी अदि उपस्थितीत होते.

  तुळजापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरुपाची अशी एकुण १०३१ व दावा पुर्व एकुण २ ९ ४६ अशी एकुण ३ ९ ७७ प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली होती . त्यापैकी प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या ६६ प्रकरणांमध्ये तसेच वाद पुर्व प्रकरणांमध्ये २८ अशी एकुण ९ ४ प्रकरणामध्ये तडजोड झाली . त्यामध्ये प्रलंबित प्रकरणापैकी दिवाणी स्वरुपाची ३२ , फौजदारी स्वरुपाची ३४ , तडजोड पात्र प्रकरणे , तसेच विविध बँकेची , ग्रामपंचायतकडील कर वसुली बाबतची दिवाणी स्वरुपाची २८ दावा पूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली . धनादेश अनादर प्रकरणी फिर्यादी पक्षाला रूपये २८०५५३ / - वसूली झाली . दावा पूर्व प्रकरणांमध्ये रुपये ८४,० ९ ७ / - रक्कमेची संबंधीत ग्रामपंचायतीला वसूली झाली . त्याचबरोबर किरकोळ फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये आरोपींना दंडात्मक शिक्षा होवून रक्कम रु . १४,२०० / - इतका दंड करण्यात आला. 

  सदर लोक अदालतीस पक्षकार / विधीज्ञ , बँक कर्मचारी , तसेच ग्रामपंचायत व नगर परिषद कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला. तुळजापूर   न्यायालयीन कर्मचारी , तुळजापूर विधीज्ञ  ,  पोलीस कर्मचारी यांनी सदर लोकअदालत यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले.

 
Top