तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर  तालुक्यातील सिंदफळ गावात 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मंगळवार दि.३०रोजी दुपारी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटने प्रकरणी घटनास्थळी दोन महिलांनी त्यास पकडल्याने आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, सिंदफळ (ता. तुळजापूर) येथील जि.प.प्रा शाळेत शिकणारी सहा वर्षिय लहान मुलगी घराच्या पाठीमागे बाथरुमला गेली असता तेथुन जात असलेला अकुंश पोपट  वडणे (रा.माळुंब्रा) याने 

 तिला शेजारील शेतात नेहून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा  प्रयत्न केला असता . मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काही महिला शेतात गेल्यावर आरोपी दुषकृत्य करताना दिसला , आरोपी नग्न होता त्याला तसेच पकडून चोप दिला व पोलिसांना बोलवुन त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 

 तुळजापूर पोलिसात गुरंन 302/22कलम 376’376(अ )(ब) भादंवी सह पोक्सो 4,6,8,12कलमान्वय गुन्हा नोंद केला आहे.


 
Top