उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत अल्पमुदतीचे पण नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रोत्साहनपर 50 हजार रुपये पर्यंतच्या लाभाचा  धाराशिव जिल्हयातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्कप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे 

 सध्या  सोसायटी व बँक पातळीवर आधार लिंक करणे व नियमित परतफेड केली आहे की नाही याचे पडताळणी   करण्याचे काम  सुरू असून  पडताळणी झाल्यानंतर लागलीच पात्र शेतकऱ्यांची यादी बनवण्याचे काम सुरू होणार आहे सन 2017 ते 2020 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी सलग दोन वर्ष घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र  फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे त्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे तरी  जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ    घ्यावा व या योजनेपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याचीही खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे आवाहन  भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्कप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे.


 
Top