उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून आणि स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे आणि सुलभ मोबाईल अॅप व्हर्जन २ विकसित करण्यात आलेले आहे. हे सुधारित मोबाईल अॅप १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतक-यांनी आपला पीक पेरा आपण तयार करून शासनाच्या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

  महाराष्ट्र शासनाचा ई - पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गतवर्षीपासून जिल्ह्यातील सुमारे २ लाख ७० हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई - पीक पाहणी भ्रमणध्वनी अॅपमध्ये नोंदणी केली आहे. मागील खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करून या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिलेला आहे.


 
Top