उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी येथील हुंकार बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक संदीप काळे व विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी बनसोडे यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी व्हाईस ऑफ मीडिया ही पत्रकार संघटना काम करणार असून मूल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी यासाठी विविध कार्यक्रम व उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. तसेच संघटनेच्या विस्तारासाठी हुंकार बनसोडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांनी सर्व तालुक्यांत 11 जणांची कार्यकारिणी करावी तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी 21 जणांची कार्यकारिणी करून संघटनेचा कार्यविस्तार करावा, असे आवाहनही त्यांच्या नियुक्तीपत्रात करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.


 
Top