वाशी / प्रतिनिधी-

 वाशी येथील अजिंक्य शाळेत शिक्षक-पालक सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी २०० पालक बंधू-भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक   एस. एल. पवार सर होते. प्रमुख पाहुणे तुकाराम वीर, राजेंद्र टाचतोडे, रागिनी चेडे, मुख्याध्यापक लक्ष्मिकांत पवार उपस्थित होते.

 यावेळी प्रास्ताविक करताना पवार सरांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती सांगितली, पालक तुकाराम वीर, गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांकडे पालकांनीही लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. शिक्षक मनोगत व्यक्त करताना शिक्षक शिवाजी दळवे यांनी विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर लक्ष देण्याची व विद्यार्थ्याच्या वाचनावर भर देण्याची गरज व्यक्त केली . यावेळी सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या अडचणी मांडल्या. त्या सोडवण्याचे मुख्याध्यापक लक्ष्मिकांत पवार यांनी आश्वासन दिले.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती शिंदे व उपस्थितांचे आभार स्वाती खाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.


 
Top