उस्मानाबाद/ प्रतिनिधी

भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बन्सी डोके यांच्या उपस्थितीत संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक रविवारी(दि.२१) सकाळी ११ वाजता शहरातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीही होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संकेत सूर्यवंशी यांनी दिली.

या बैठकीत मराठा आरक्षण, इडब्ल्यूएस, शेतकरी आत्महत्या, मराठा आंदोलनावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष डोके यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही देण्यात येणार आहेत. बैठकीला जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संकेत सूर्यवंशी, जिल्हा प्रवक्ते खंडू राऊत यांनी केले आहे.

 
Top