उमरगा / प्रतिनिधी-

ब्राह्मण संघटनेतर्फे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम उमरग्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात महिला आणि लहान मुला मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वप्रथम दीप प्रज्वलन सौ अनिता बडवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कृष्ण जन्म मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळेस उपस्थित स्पर्धकांनी त्यांचे विविध कला गुण दर्शन केले. त्यामुळे त्यामध्ये लहान मुलांचे वेशभूषा नृत्य इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.

 महिलांच्या दांडिया चा कार्यक्रम साजरा झाला. तसेच महिलांनी गवळणी पाळणा तसेच कृष्ण गीत सादर केले. वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. मोठ्या जल्लोषात दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वप्ना चिंचोलीकर यांनी उत्तमरीत्या पार पाडले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अध्यक्ष सौ उषा देशमुख, उपाध्यक्ष सौ छाया होदलुरकर, सचिव सौ श्रुती बडवे, कोषाध्यक्ष सौ कांचन बडवे, तसेच संघटनेचे इतर सदस्य पूजा बडवे, सीमा कार्लेकर, स्वप्ना चिंचोलीकर, प्रांजली कुलकर्णी यांनी मेहनत घेतली. सौ साधना ताशी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. तसेच सौ नीलिमा इनामदार यांनी ब्राह्मण संस्कृतीवर मार्गदर्शन केले. मोठ्या उत्साहात व सर्वांच्या उपस्थितीत  ब्राह्मण संघटनेचा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम पार पडला.


 
Top