उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  उस्मानाबाद  येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा)  आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. 

नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र परिवर्तन होणार आहे. त्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी, प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचारी यांच्या नवनवीन कल्पना जाणून घेण्यासाठी रुसा व एम.एस. एफ.डी.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा रुसाचे स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर आणि एम. एस. एफ. डी. .ए. चे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ.निपुण विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. 

या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी भूषविले.कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून एम एस एफ डी चे प्रशासकीय जनरल मॅनेजर प्रोफेसर डॉ.चंद्रकांत रावळ , रूसाचे डेप्युटी फायनान्स ऑफिसर श्री राहुल कदम एम.एस.एफ.डी.ए. च्या सेंट्रल समन्वयक श्रीमती सुजाता वरदराजन आणि एम.एस.एफ.डी. ए.चे प्रशासकीय सहाय्यक श्री रोहित लोंढे हे लाभले होते.सदर कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील 50 अध्यापक आणि 50 निवडक विद्यार्थी उपस्थित होते.  सदर कार्यशाळेचे महाविद्यालयाचे समन्वयक प्रो.डॉ. जीवन पवार हे होते. सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

 
Top