तुळजापूर / प्रतिनिधी :- 

 तालुक्यात सतत पडणाऱ्या पाऊसाने खरीप पीके पाण्यात गेल्याने  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पीकांचे विनाविलंब पंचनामे करून तात्काळ सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी  तसेच २०२० सालीचा पीक विमा   लवकर मिळावा , नियमीत बँकेचे हाते भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रु . शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावे,  दि . १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत   करावी, अन्यथा स्वातंत्र्य दिनादिवशी  तहसील कार्यालय तुळजापूर येथे एक दिवसीय लक्षणीक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने तहसिलदार यांना निवेदन देवुन दिला.

निवेदन देताना  शेतकरी संघर्ष समितीचे सरदारसिंग ठाकुर, महादेव बिराजदार, खुशाल ठाकुर,  मकबुल मुल्ला,  लक्ष्मण निकम, चंद्रकांत शिंदे आदींची उपस्थिती होती. 

 
Top