उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हयात ग्रामपंचायत सार्वत्रिक  निवडणूक होत असलेल्या गावात  कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मतदान व मतमोजणी शांतेत निर्भय व नि:पक्षपाती पध्दतीने पार पाडण्याकरिता उस्मानाबाद जिल्हयातील निवडणूक होत असलेल्या सोबतच्या यादीतील या विभागाची अनुज्ञप्ती कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदान होत असून त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तास अगोदर मद्य विक्री करण्यास मनाई/कोरडा दिवस म्हणजे दि.2 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजे पासून ते दि.4ऑगस्ट 2022 रोजीचा मतदानाचा संपूर्ण दिवस तसेच दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी होणार असल्याने (मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक)(मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने  तहसीलदार निश्चीत करतील त्यानुसार राहील) मतमोजणी संपेपर्यंत सर्व प्रकारचे घाऊक व किरकोळ मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे व त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेशित केले आहे.


 
Top