उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यापार्श्वभुमीतून मा.पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या संकलपनेतुन   पोलीस मुख्यालय आवार व परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. 

यावेळी  जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर, मुख्यकार्यकारी अधिकारी  राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले-डंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच उस्मानाबाद शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद अशा सर्वांनी 1000 वृक्षांची लागवड केली.

 यावृक्षारोपन दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी, उस्मानाबाद श्री. घेटे, पोलीस निरीक्षक- श्री जयस्वाल, श्री खनाळ, श्री दसुरकर, श्री पिटे, राखीव पोलीस निरीक्षक- दुबे, सपोनि- श्री बारवकर, श्री पवार, श्री भराटे, पोलीस मुख्यालय येथील पोलीस अंमलदार उपस्थित होते. 


 
Top