उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या उस्मानाबाद जिल्हाप्रमुखपदी माजी उपनगराध्यक्ष सुरज राजाभाऊ साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते   निवडीचे पत्र श्री.साळुंके यांना देण्यात आले. या निवडीचे जिल्हाभरातील शिंदे गटातील जुन्या कट्टर शिवसैनिकानी स्वागत केले आहे.

 राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटासोबत उस्मानाबाद जिल्ह्यातून सुरज साळुंके हे खंबीरपणे उभे राहिले. विद्यमान सरकारमधील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचे कट्टर समर्थक असलेले सुरज साळुंके यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुरूवारी शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख पदी त्यांची निवड करण्यात आली. शिंदे गट शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे युवक नेते अजित लाकाळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी पार पाडताना जिल्ह्यात संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे श्री.साळुंके यांनी सांगितले.


 
Top