उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 बेंबळी ता.जि.उस्मानाबाद येथे उमेद गटांच्या महिलांसाठी तुळजापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या आमदार निधीमधुन रु.10.00 लक्ष निधी ग्रामसंघ कार्यालय (महिला भवन) बांधकामासाठी देण्यात आला होता. सदरील महिला भवनचे बांधकाम पुर्ण झाले असुन  त्याचे लोकार्पण जिल्हा परीषदेच्या माजी उपाध्यक्षा  सौ.अर्चना  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी बेंबळी च्या सरपंच  वंदना कांबळे, बालाजी गावडे,  नानासाहेब कदम,  सिमंताबाई दरेकर, व्हा.चेअरमन व्यंकट सोनटक्के, संतोष आगलावे, राजाभाऊ सोनटक्के,  मोहन खापरे, नंदकुमार गावडे, प्रकाश शेळके, अंकुश तानवडे, नंदकुमार मनाळे, सोसायटी संचालक मारुती निकम, अजित खापरे, नेहरु भोरे, मन्मथ बेलुरे, बाळासाहेब होनसनाळे,  अशोक माळी, अजित खापरे, शाम होनसनाळे, नवनाथ कांबळे, राजाभाऊ रसाळ, महादेव गावडे, मारुती कसपटे, शीवाजी गावडे, ग्रा.पं. सदस्य विदया माने, नंदाताई रसाळ, सुशीलाबाई गावडे, अश्वीनी कसपटे, सिआरपी संजीवनी शीडोळे, शकुंतला बनसोडे, अगाशेताई इतर महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.


 
Top